पी.एम. किसान योजना माहिती

योजनेचे उद्दिष्ट :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000/- आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये ₹2000/- च्या हप्त्यांमध्ये दिली जाते.

पी.एम. किसान योजना :
  • पी.एम. किसान ही 100 टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे 100% अर्थसहाय्य आहे.
  • या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष ₹6000/-पाठबळ म्हणून लाभ मिळतो.
  • कुटुंबाची व्याख्या – पती, पत्नी व त्यांची अल्पवयीन (18 वर्षाखालील) मुले.
  • राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून लाभार्थी कुटुंबांची ओळख/पडताळणी करतात.
  • लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर DBT द्वारे दिला जातो.
  • या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी आहेत.
योजनेचे अपात्रतेचे निकष :

खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.

  1. सर्व संस्थात्मक जमीनधारक
  2. अशी शेतकरी कुटुंबे जे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली किंवा वरिष्ठ श्रेणीशी संबंधित आहेत
  3. संवैधानिक पद धारण करणारे / केलेले आजी व माजी व्यक्ती
  4. आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, खासदार/राज्यसभा सदस्य, आमदार/विधानसभा परिषद सदस्य
  5. महापालिकेचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष
  6. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी. चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  7. सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  8. मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
  9. नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.