श्रावण बाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना अंतर्गत वय वर्ष 65 वर्ष व 65 वर्षावरील गरजू, गरीब, आर्थिक दृष्टा कमजोर,निराधार वृद्ध लाभयार्थ्याना महाराष्ट्र राज्य शासना तर्फे प्रतिमहा 1500 रुपये बँक खात्यावर वितरित केले जातात
विहित नमुन्यात अर्ज पूर्ण भरून.
आवश्यक दस्तऐवज ,दारिद्र्य रेषेखालील कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न 21000 रुपये,वयाचे वर्ष 65असल्यास संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पुरावा जोडा.
फाईल तलाठी ,ग्राम सेवक ,पोलीस पाटील,सरपंच यांच्या कडून तपासून सह्या घ्या.
सेतू केंद्रातून किंवा sas.mahait.org फाईल मधील सर्व माहिती भरून अर्ज सादर करा.